कानशिवनी गावात माकडांची टोळी,
माकडांच्या हौदोसाने ग्रामस्थ वैतागले,
संबंधित विभागाने दखल घेणे गरजेचे,
वृद्धा सह लहान मुलांच्या जीवाला धोका,
अनेक शेती पिका सह घराचे नुकसान,
शेतातील पिके धोक्यात,
शेतात काम करावे की ,की घरांची रखवाली,
संजय तायडे
सत्य लढा न्यूज नेटवर्क
अकोला महसूल मंडळातील कानशिवनी गावात माकडांची टोळी सक्रिय असुन घरा सह इतर जीवनावश्यक वस्तूची नासधूस करुन लहान मुलांन सह म्हातारी माणसाला या माकडांच्या टोळ्या पासून जीवीतास धोका निर्माण झाला आहे, संबंधित विभागाने दखल घेऊन सदर माकडांच्या टोळीचा बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे,
अकोला तालुक्यातील कानशिवनी हे गाव आहे, बहुतांश शेतकरी, शेतमजूर आदी लोक वस्ती आहे, येथील लोकांना शेती हाच उदरनिर्वाहाचे साधन आहे, शेतात राबून कष्ट करण्या शिवाय दुसरा पर्याय नाही, परंतु गत काही दिवसांपासून कानशिवनी शेतशिवारात वण्यप्राण्यांनी हौदोस घातला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना वण्यप्राण्यांपासुन पिकांचे रक्षण करण्यासाठी रात्रीचे दिवस करून दमछाक होत आहे, शिवाय माकडांच्या टोळ्या ह्या गावात येऊन वाटेल तसे नुकसान करत आहेत, शिवाय घरांचे नुकसान सह म्हातारे व लहान मुलांना या माकडांच्या टोळ्या पासून जीवीतास धोका निर्माण झाला आहे, हातचे कामधंदा सह मोलमजुरी सोडून या माकडांच्या टोळ्यांना गावाबाहेर काढून देण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी रोही ,रानटी वराह,हरण्याचे कळप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत, हे नुकसान टाळण्याकरीता वण्यप्राण्यांपासुन पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांची दमछाक होत आहे, दरम्यान संबंधित विभागाने दखल घेऊन गावात हौदोस करत असलेल्या वानरांचा बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे,