दि मोहता मिल कामगार सहकारी सोसायटी मर्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
दि मोहता मिल कामगार सहकारी सोसायटी रजिस्ट्रेशन नंबर २९४ हरिहरपेठ, जुने शहर, अकोला. ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २४/०९/२०२३ रोजी रविवारी सकाळी १० वाजता संस्थेच्या डाबकी येथील हनुमान मंदिर ग्रामपंचायत डाबकी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेपुढे पुढील विषयांना मान्यता देण्यात आली
दि. १८/९/२२ रोजी झालेल्या संस्थेच्या ७९ व्या वार्षिक आमसभेचे वृत्तांत वाचून कायम कायम करण्यात आले.
तसेच संस्थेच्या दि. ३१/३/२२ ला संपलेल्या आर्थिक वर्षांचे अहवालातील नफा-तोटा / ताळेबंद / नफा विनियोजन व अंदाज पत्रकास मंजुरी देण्यात आली..
तसेच संस्थेच्या संपणाऱ्या आर्थिक वर्ष २०२३-२४ चे लेखा परिक्षण करण्याकरिता विलास ह. काळे प्रमाणित लेखापरिक्षण अकोला यांची नियुक्ती करण्याकरिता मंजूरी देण्यात आली
२०२१-२२ च्या वैधानिक लेखा परिक्षणाच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देण्यात आली.
२०२२-२३ च्या ऑडीट अहवाल वाचून मंजुरात मंजुरात देण्यात आली.
सभासदांना त्यांच्या हक्काचा प्लॉट उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी मोहता मिल कामगार सहकारी सोसायटी च्या अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय घेण्यात आले यावेळी मोहता मिल कामगार सहकारी सोसायटी अध्यक्ष देवकीनंदन पतरोडीया सचिव ज्ञानेश्वर घोडके मोहता मिल कामगार सहकारी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.