राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला
वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर तालुक्यातील रिधोरा नजिक घडली आहे.आज सकाळी मुसळधार पावसामुळे समोरचं काही दिसलं नाही त्यामुळे ओव्हरटेकमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक हरियाणावरून विशाखापटनम येथे जात होता. त्यामध्ये टाईल्स चा माल होता.वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मातीच्या वळणावरून ट्रक उलटला. चालक प्रशांत यादव व क्लिनर पेलाव यादव यांना ट्रक मधून बाहेर काढण्यात आले.यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली होती.या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे.
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला