बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन

बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन

गुरुवारी गणेश भक्त आपल्या गणरायाला देतील निरोप

बोरगाव मंजू शहरात १४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग, ग्रामीण भागात ८४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग, ग्रामीण भागात २७ गावात एक गाव एक गणपती

पोलिस प्रशासनाचा पुढाकार तर

ग्रामस्थांनी केले सहकार्य

संजय तायडे सत्य लढा न्यूज – तालुका प्रतिनिधी

बोरगाव मंजू – दरवर्षी प्रमाणे यंदाही अंनत चतुर्थीच्या दिवशी भाविका सह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा वतीने वाजत गाजत आपल्या गणरायाची स्थापना केली, दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,
बोरगाव मंजू शहरात एकुण १४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा वतीने सहभागी झाले आहेत, तर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकुण ७२ गावात ७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी होत गणेश मुर्तीची स्थापना केली,तर बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील २७ गावात एक गाव एक गणपती स्थापना करून उत्सव साजरा होत मागील वर्षी १७ गावात एक एक एक गणपती उत्सव होता तर या वर्षी ठाणेदार मनोज केदारे सह पोलिसांनी गावा गावात सभा घेऊन जनजागृती करुन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी आवाहन केले होते, जनतेने प्रतिसाद देत या वर्षी दहा मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपती उत्सव साजरा होत आहे तर पोलिस प्रशासनाच्या या अभिनव संकल्पनेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सह ग्रामस्थांनी सहकार्य केले,


दरम्यान बोरगाव मंजू शहरातील एकूण १४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीत सहभागी होत आहेत,
तर ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव गणेश विसर्जन सांगता दिनांक २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे, तर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, मुर्तिजापूर पोलिस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाच्या वतीने मंगळवारी शहरातील मिरवणुकीच्या मार्गावर ठाणेदार मनोज केदारे, दुय्यम ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, सह शहरातील मुख्य मार्गावरून पोलिसांनी पथसंचलन करून
बोरगाव मंजू शहरा सह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा वतीने आयोजित मिरवणुकीच्या वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी जनतेने पोलिस प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार मनोज केदारे यांनी केले आहे, सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला असुन ४ अधिकारी,६५ अंमलदार,३५ होमगार्ड सैनिक,तर अतिरिक्त पोलिस बल तैनातीत करण्यात येत आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news