आम आदमी पार्टीच्या वतीने विदर्भात झाडूयात्रा 2 ऑक्टोंबरपासुन 5 ऑक्टोबरला सायंकाळी अकोला महानगरमध्ये प्रवेश करेल
अकोला. महाराष्ट्रातील जनता विशेषता विदर्भातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांचे ज्वलंत प्रश्न तसेच वाढती बेरोजगारी, महागाई, शेतीविषयक प्रश्नावर शासनाची उदासीनता यासारख्या अनेक विषयावर सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करण्यासाठी तसेच त्यांची थेट भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी ‘झाडू यात्रे’ च्या माध्यमातून गावोगावी जाऊन नागरिकांची भेट घेणार आहेत. ही झाडूयात्रा सेवाग्राम येथून २ऑक्टोंबरला महात्मा गांधीजी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 2 ऑक्टोंबर रोजी सुरू होऊन झाडू यात्रा ही विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातील विविध ठिकाणावर सभा व रॅलीचे माध्यमातून जनतेशी थेट संपर्क करणार आहे., आम आदमी पार्टीची ‘झाडू यात्रा २ ऑक्टोंबरपासून सुरू होऊन 5 ऑक्टोबरला सायंकाळी अकोला महानगरमध्ये प्रवेश करेल, असा विदर्भाचा दौरा करत 11 ऑक्टोबरला चंद्रपूर राजुरा येथे झाडू यात्राचे समापन होईल, अशी माहिती अकोळा जिल्हाध्यक्ष कैलास प्राणजळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
सर्वसामान्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या या थेट पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येतील. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही सर्वसामान्यांना धोका देणारी आहे, सर्वसामान्यांचा या राजकारण्यावर अविश्वास निर्माण झालेला आहे, एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवून एकत्र येणारे हे नेते यांना जनतेच्या प्रश्नांचा मात्र विसर पडलेला आहे, यांच्या याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम आदमी पक्षाची ‘झाडू यात्रा’ आयोजित केलेली आहे, या यात्रेत मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्राचे संघटक सचिव एडवोकेट मनीष मोडक , अकोला जिल्हाध्यक्ष कैलास प्राणजळेआम आदमी पार्टीच्या वतीने विदर्भात झाडूयात्रा 2 ऑक्टोंबरपासुन
5 ऑक्टोबरला सायंकाळी अकोला महानगरमध्ये प्रवेश करेल
अकोला. महाराष्ट्रातील जनता विशेषता विदर्भातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांचे ज्वलंत प्रश्न तसेच वाढती बेरोजगारी, महागाई, शेतीविषयक प्रश्नावर शासनाची उदासीनता यासारख्या अनेक विषयावर सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करण्यासाठी तसेच त्यांची थेट भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी ‘झाडू यात्रे’ च्या माध्यमातून गावोगावी जाऊन नागरिकांची भेट घेणार आहेत. ही झाडूयात्रा सेवाग्राम येथून २ऑक्टोंबरला महात्मा गांधीजी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 2 ऑक्टोंबर रोजी सुरू होऊन झाडू यात्रा ही विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातील विविध ठिकाणावर सभा व रॅलीचे माध्यमातून जनतेशी थेट संपर्क करणार आहे., आम आदमी पार्टीची ‘झाडू यात्रा २ ऑक्टोंबरपासून सुरू होऊन 5 ऑक्टोबरला सायंकाळी अकोला महानगरमध्ये प्रवेश करेल, असा विदर्भाचा दौरा करत 11 ऑक्टोबरला चंद्रपूर राजुरा येथे झाडू यात्राचे समापन होईल, अशी माहिती अकोळा जिल्हाध्यक्ष कैलास प्राणजळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
सर्वसामान्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या या थेट पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येतील. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही सर्वसामान्यांना धोका देणारी आहे, सर्वसामान्यांचा या राजकारण्यावर अविश्वास निर्माण झालेला आहे, एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवून एकत्र येणारे हे नेते यांना जनतेच्या प्रश्नांचा मात्र विसर पडलेला आहे, यांच्या याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम आदमी पक्षाची ‘झाडू यात्रा’ आयोजित केलेली आहे, या यात्रेत मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्राचे संघटक सचिव एडवोकेट मनीष मोडक , अकोला जिल्हाध्यक्ष कैलास प्राण जळे, संदीप जोशी, डॉ खंडेराव दाभाडे, प्रा गवई प्रदीप कुमार गवई उपस्थीत होते
व आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांनी केले आहे