बाळापूर वाडेगाव रोडवरील वघाडी नाल्याजवळ भरधाव ट्रकचा व दुचाकी स्कुटी गाडीचा भीषण अपघात ; २ युवकांचा मृत्यू

बाळापूर वाडेगाव रोडवरील वघाडी नाल्याजवळ भरधाव ट्रकचा व दुचाकी स्कुटी गाडीचा भीषण अपघात ; २ युवकांचा मृत्यू

बाळापूर :- बाळापूर वाडेगाव रोडवरील खामखेड फाट्याजवळील वघाडी नाल्याजवळ भरधाव ट्रकचा व दुचाकी स्कुटी गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवार दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली असून यां भीषण अपघातात दुचाकी स्कुटी गाडीवरील एका युवकांचा जागेवरच तर दुसऱ्या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार आयुष संतोष रावरकर वय २२ वर्ष रा.राजंदा व ओम राजेश आसोले वय २० वर्ष रा. गाडगेनगर हरिहरपेठ, अकोला हे दोन्हीही युवक दुचाकी गाडी क्रं. एम. एच.३० बी.एस.६१८८ या स्कुटी गाडीने वाडेगाव कडे जातं असतांना खामखेड फाट्यानजीक असलेल्या वघाडी नाल्याजवळ दुपारी ४ वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक. क्रं. एम.एच.१२ एच.डी.५७८५ या ट्रकची जोरदार धडक झाली. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत या अपघातात दुचाकीवरील २२ वर्षीय आयुष या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला तर २० वर्षीय ओमचा अकोला येथे रुग्णालयात नेतांना वाटेतचं मृत्यू झाल्याची माहिती बाळापूर पोलिसांनी दिली असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील अधिक तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news