‘ज्येष्ठ नागरिक संघाचे त्रैमासिक विवेक विचार चे विमोचन थाटात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक संघाचे त्रैमासिक विवेक विचार चे विमोचन थाटात संपन्न

जेष्ठ नागरिक संघ अकोला चे दुसऱ्या पाक्षिक सभेत विवेक विचार या त्रेमासिकाचे सप्टेंबर 2023 चे अंकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते थाटात संपन्न झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार होते. व्यासपीठावर प्रादेशिक कृषी समिती अध्यक्ष चोथमल सारडा जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष नारायण अंधारे, संघाचे सचिव प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती होते. खरा तो एकची धर्म या साने गुरुजी यांची प्रार्थना सुमन शहा यांनी प्रस्तुत करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रा.यादव वक्ते आणि रमेश डागा यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या विवेक विचार चे संपादक मोहन शास्त्री जलतारे यांनी त्रैमासिका बाबत माहिती दिली संघाचे माजी अध्यक्ष अशोक कुळकर्णी यांनी आपले अनुभव कथन केले जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष नारायण अंधारे यांनी ऑक्टोबर महिन्यात पुणे येथे होत असलेल्या आयस्कॉन अधिवेशनाची माहिती दिली. प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती यांनी प्रास्ताविक आणि जेष्ठ नागरिक दिन आयोजनाबाबत माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रकाश शेगोकार यांनी संघाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सभेला प्रकाश जोशी श्री कन्हैया चनकेसला सुरेश खंडेलवाल, रमेश बाहेती, प्रा‌. डॉ. देवकिसन बाहेती प्रकाश जोशी नवल टावरी प्रमोद मुळे सुनील खोत नेमिनाथ इंदाने एम एस मानकर देविदास निखारे प्रमोद मुळे अनंता अंधारे आधी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
सामुदायिक पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरत गुप्ता आणि संगीता इंगळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news