रेल्वे यात्री एकता मजदूर संघाने स्टेशन मॅनेजरला दिले डस्टबीन
ट्रेनमध्ये कचरा टाकू नका. प्रवाशांना दिला संदेश :
टीसीने रेल यात्री एकता मजदूर संघाचे प्लॅटफॉर्म तिकिट तपासले
अकोला — रेल्वे स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत मध्य रेल्वे अकोला रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ वर अकोला रेल्वेस्थानक व्यवस्थापकाला रेल्वे प्रवासी एकता मजदूर संघातर्फे दहा डस्टबिनचे वाटप करण्यात आले असता अचानक टी सी आले व सर्वांना प्लॅटफॉर्म तिकिट घेण्यास सांगितले.
रेल्वे प्रवासी एकता मजदूर संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्म तिकिट काढून रेल्वे गाडीत जाऊन प्रवाश्यांना रेल्वेचे नियम पाळा आणि रेल्वेचे कोणतेही नुकसान करू नका. रेल्वेत घण करू नका असे आवाहन केले .रेल्वे प्रवासी एकता मजदूर संघ आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे स्थानकाबाहेर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.याप्रसंगी अकोला स्टेशन व्यवस्थापक संतोष कवडे, सीटीआय देशमुख, चीफ गुड्स सुपर व्हॉयेजर बी डी राऊत ,अकोला HI विवेक राय ,कनिष्ठ लिपिक नाज यास्मिन ,वैष्णवी पाली रेल्वे सफाई कर्मचारी व रेल यात्री एकता मजदूर संघाचे संस्थापक अध्यक्ष रेल्वे सल्लागार कमिटी सदस्य पत्रकार नंदगोपाल पांडे ,सचिव श्याम पांडे ,महाराष्ट्र अध्यक्ष एजाज अहमद, महाराष्ट्र उपाध्यक्ष डीआरयूसी सदस्य राजनारायण मिश्रा ,महाराष्ट्र महिला सचिव सौ लीना पाचबोले, उपाध्यक्ष फुलाबाई राठोड, अकोला महिला जिल्हा अध्यक्षा स्नेहल कांबळे, शेगाव शहर महिला अध्यक्षा प्रणिता धामांडे, मंगला शोळंके, अकोला जिल्हाध्यक्ष रवी जैन, उपाध्यक्ष ललित पांडे ,विजय वानखडे उपस्थित होते.