बाळापूर शहरात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण काढले
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर – बाळापूर शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत पोलीस प्रशासन व नगर परिषदेच्या वतीने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुक मार्गावरील अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानांवर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे.शहरातील स्टेट बँक कडे जाणाऱ्या रोड सह,कॉटन मार्केट परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.
अतिक्रमण हटविण्यात आल्याने वाहतुकीला वाट मिळत श्वास मोकळा झाल्याचे पाहायला मिळाले.शहरातील मुख्य रस्ते, फूटपाथ तसेच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगर परिषद मुख्याधिकारी शेषराव ताले,ठाणेदार अनिल जूमळे, सहा पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांनी पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात अतिक्रमण काढले.
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर