केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा
अकोला, दि. 27 : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी (29 सप्टेंबर) अकोला येथे येत आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : वाशिम येथून हेलिकॉप्टरने दु. 1.45 वा. अकोला विमानतळ येथे आगमन, दु. 1.50 वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे प्रयाण, दु. 2 वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ‘शिवार फेरी’ कार्यक्रमाचे उद्घाटन, दु. 4 वा. अकोला विमानतळाकडे प्रयाण, दु. 4.15 वा. अकोला विमानतळ येथून हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण.