करवसुलीच्या कंत्राट मध्ये आयुक्तांची सारवासारव ?

करवसुलीच्या कंत्राट मध्ये आयुक्तांची सारवासारव ?

कॅमेरा बंद पत्रकार परिषद चा अफलातून प्रकार?

अकोला:- स्वच्छता पंधरवडा अभियाना अंतर्गत आज महानगर पालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी ह्यांनी पत्रकार परिषदचे आयोजन केले होते मात्र यात आपल्या रुबाबदार शैलीचा परिचय आणत आधी न्युज चा कॅमेरा बंद करण्याची विनंती केली पत्रकारांनी ही त्यांच्या याविनंतीला मान राखुन आप आपले कॅमेरे बंद केल्याने आयुक्त हे काहीतरी लपवित असल्यामुळें आजच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेला प्रकार म्हणजे दाल मे कुछ काला असल्याचा दावा यामुळे सिध्द होत असल्याचे दिसुन आले.करवसुली च्या खाजगीकरणाची बातमी सत्य लढा ही नेहमीच बातम्या प्रकाशित करत असते आज कॅमेरा बंद पत्रकार परिषद मुळे पुरी दाल ही काली असल्याचा प्रत्यय आला.करवसुलीच्या खाजगीकरणाविषयी उत्तर देतांना आयुक्तांना अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यात महाराष्ट्र शासन किंवा नगर विकास यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्यामुळे आयुक्त हे शहर विकास करत आहे की भकास यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. अतिक्रमण कार्यवाही बाबत सत्य लढा चे संपादक यांनी जठारपेठ मध्ये कार्यवाही करता परंतु महापालीकेच्या नाकावर टिच्चुन असलेल्या अतिक्रमण धारकावर कार्यवाही का करत ननाही तर असा प्रश्न केला त्यावर आयुक्तांचे उत्तर म्हणजे तुम्हीच तुमच्या मुला बाळासह यांच्या कडून खरेदी करता आणी आम्हला प्रश्न विचारता असे म्हणुन आपली जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

यावरुन असे दिसत आहे.अश्या बेजबाबदार उत्तरामुळे आयुक्त तथा प्रशासक यांच्या पदाला काळीमा फासण्याची लाजिरवाणी बाब म्हणण्यात हरकत नाही.अश्या बेजवाबदार उत्तरामुळे जण सामान्यावर याचे काय परिणाम होतील याचा विचार न केल्याने यावर शहरात चर्चेला उधान आले आहे. खाजगीकरण कर्मचारी महानगरपालिकेचा लोगो वापरत असल्याचे प्रश्नावर मला माहिती नाही असे बोलत आपले बोलणे टाळले याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे अस म्हणायला हरकत नाही कारण याबाबत सत्य लढा यावर सातत्याने बातम्या प्रकाशित करत असुनही आयुक्त काही करण्यास धजावत नाही म्हणजे यावर राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरु आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर सडेतोड उत्तर देण्या ऐवजी चालढकल केल्याने नामुष्कीची वेळ मात्र आयुक्तांवर या निमित्ताने दिसुन आली. महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असुन यावर लगाम न लावता मदत करत असल्याने अशी टाळाटाळ करत असल्याचे आजच्या पत्रकार परिषद मध्ये दिसुन आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news