अकोल्यातील एमआयडीसी मधील बी.के. चौक येथे आयशर ट्रकला आग; आगीत ट्रक ड्रायव्हर होरपळून गंभीर जखमी..!
अकोला शहरातील एमआयडीसी मधील बी.के. चौक येथे दुपारच्या वेळेस आग लागल्याने अकोला शहरात एकच खळबळ उडाली. आग एवढी भीषण होती की आगीत आयशर ट्रक ड्रायव्हर होरपळून गंभीर भाजला गेला व ट्रक ड्रायव्हर ला जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.