अतिदुर्ग मेळघाट परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांची शिवार फेरीला भेट
अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य योजना मृद विज्ञान विभाग डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तर्फे बोलवण्यात आलेले धारणी परिसरातील घोटा, मंथवडी, बोरीकर, चीजी, चावऱ्या, नागझिरा इत्यादी गावातील एकूण 25 शेतकरी शिवार फेरीला भेट देण्याकरिता आले होते.
भेटीदरम्यान सदर शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य योजनेतर्फे प्रति शेतकरी दोन लिटर मायक्रो ग्रेड दोन या द्रवरूप खताचे वितरण करण्यात आले तसेच परसबागेत लावण्याकरता त्यांना किचन गार्डनिंग चे बियाणे पुरवण्यात आले. सदर शेतकऱ्यांनी उत्साहाने शिवार फेरीचा आनंद घेतला यावेळी त्यांच्या समवेत सूक्ष्म अन्नद्रव्य योजनेचे डॉ संदीप हाडोळे व श्री प्रशांत सरप हे हजर होते
यावेळी सर्व शेतकऱ्यांनी कुलगुरू महोदय डॉ शरदराव गडाख व संशोधन संचालक डॉ विलास खर्चे यांच्यासोबत विचारांची आदान प्रदान केली. आलेले शेतकरी महान ट्रस्ट उतावडी तालुका धारणी यांचे विद्यमाने तसेच मृद विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय भोयर यांच्या प्रयत्नाने शिवार फेरी करिता आले होते.