दिव्यांग विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेत उत्साहाने सहभाग
अकोला, दि. ३० : दिव्यांग कल्याण विभागातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत येथील ११ दिव्यांग शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
जिल्हा क्रीडा संकुलात जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदींच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ झाला.
विविध शाळांचे सुमारे ४०० विद्यार्थी उपस्थित होते.
दिव्यांगांच्या धावणे, पोहणे, पासिंग द बॉल, बुद्धिबळ, गोळाफेक, लांब उडी आदी स्पर्धा झाल्या. यावेळी आरोग्य तपासणी, कृत्रिम अवयवासाठी तपासणी व मोजमाप घेण्यात आले. महात्मा गांधी सेवा संघ, डॉ. गजानन कदम, डॉ. राहुल होतवाणी यांनी सहकार्य केले.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेखर भोंबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील बोंगीरवार यांनी आभार मानले.