मनपात स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत कचरा विलगीकरण व त्यावरील प्रक्रियाबाबत विद्यार्थ्यांची कार्यशाळा संपन्न.
अकोला दि. 29 सप्टेंबर 2023 – आज दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे स्वच्छ सर्व्हेक्षण – 2023, स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत कचरा विलगीकरण करून त्यावरील प्रक्रिया बाबत कौलखेड येथील ज्ञान दर्पण इंग्रजी प्राथमिक शाळा, मां रेणुका मराठी प्राथमिक शाळा आणि श्री चिमनलालजी रामप्रसादजी भरतीया माध्यमिक शाळा यांच्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत कचरा विलगीकरण करणे तसेच विलगीकृत कच-यावर करण्यात येणा-या प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.
सदर कार्यशाळेला जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ.सुचेता पाटेकर प्रमुख आमंत्रित म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मनपा प्रशासन अधिकारी अनिल बिडवे, शाळा मुख्याद्यापिका पल्लवी कुलकर्णी, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, मनपा मुख्य आरोग्य निरीक्षक संजय खोसे यांचेसह आरोग्य निरीक्षक रवि माहोत, धनराज पचेरवाल आदींनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. यामध्ये ओला कचरा अंतर्गत समावेश असलेल्या टाकाऊ वस्तू तसेच सुका कचरा अंतर्गत समावेश असलेल्या टाकाऊ वस्तू याची विस्तृत माहिती देऊन कच-यावर आवश्यक शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करून पुनर्वापर व खत निर्मिती करण्याकरिता राबविण्यात येणारी प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती विषद करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे शाळा परिसरातील रहिवाशी नागरिकांना कचरा विलगीकरण करणे व त्याचे महत्व तसेच एकल यूज प्लास्टीकचे वापर पुर्णपणे बंद करणे व केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबत घरोघरी जाऊन माहिती दिली असता त्यांना आलेले अनुभव कथन करतांना नागरिक आवश्यक सकारात्मक प्रतिसाद देण्यास उत्सुक नसल्याचे तसेच कचरा संकलित करून त्याचे विलगीकरण करून मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्ये टाकणे संदर्भात उत्सुक नसल्याचे निर्दशनास आल्याचे सांगितले. त्यामुळे सदर नागरिकांना यापासून होणारे दुष्परिणामाची जाणीव करून दिल्यानंतर त्यांचे नकारात्मक विचारांमध्ये बदल होऊन त्यांचा दृष्टीकोण सकारात्मक झाला असल्याचे सांगितले.
सदरचा उपक्रम हा नागरिकांनी स्वेच्छेने आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रतिसाद दिल्यास आपले शहर स्वच्छ व सुंदर होण्यापसून दूर राहणार नाही तसेच विद्यार्थ्यांव्दारे नागरिकांमध्ये घरोघरी जाउन जनजागृती करण्याच्या कामाचे मार्गदर्शन पर बोलतांना डॉ.सुचेता पाटेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.