मनोरुग्ण तसेच निराधारांना दिला मानव सेवा समितीने दिला आधार!

मनोरुग्ण तसेच निराधारांना दिला मानव सेवा समितीने दिला आधार!
अकोल्या शहरात मोठ्या प्रमाणात मनोरुग्ण तसेच निराधार मोठ्या प्रमाणात असून यांना माणुसकीचा आधार म्हणून मानव सेवा समितीने एक नवीन उपक्रम राबवला असून त्यामध्ये मनोरुग्णांची वाढलेले दाढी कटिंग करून देणे तसेच त्यांची आंघोळ घालून देणे. मनोरुग्णांना नवीन कपडे देऊन त्यांना रोज जेवणाची व्यवस्था मानव सेवा समिती करीत आहे. त्यांच्या या उपक्रमाला सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच निराधार व्यक्तींना पोटभर जेवण देण्यात येत असून त्यांना सुद्धा नवीन कपडे दिले जाणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात बाल भिक्षेकरी सुद्धा भिक्षा मागताना दिसून येत असल्यामुळे मानव सेवा समितीच्या वतीने या मुलांना नवीन कपडे तसेच शिक्षणाचे धडे शिकवण्याचा मानस मानव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. या उपक्रमात मानव सेवा समितीचे मार्गदर्शक मनपा आरोग्य विभाग विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर. योगेश मारवाडी. अध्यक्ष विनोद गोराण. उपाध्यक्ष रवि माहोत .सचिव जोगेंद्र खरारे.उभेद सर,ॲड.सतिश बोयत धनराज पचेरवाल. बादशाह पारोचे. विशाल पारोच. राजेश्वर गोडाले .रविंद्र वानखडे. निलेश घावरे. सुनिल कंडेरा. गोविंद करिहार. प्रविण मनोहर. संदिप भाऊ. राकेश चिरावंडे .विरु बेंडवाल .आकाश सावते .मानव सेवा समिती सदस्य यांनी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news