अग्निशमन विभागातील कर्मचारी रमेश भाऊ वायदांडे यांचा सेवानिवृत्त निमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला असल्याने सर्वांनी मनापासून त्यांचे स्वागत केले.
यानिमित्ताने रमेश भाऊंना अग्निशमन विभाग प्रमुख अधिकारी श्री हारुण मनियार व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सुनिल इंगळे यांनी सेवानिवृत्तीचा क्षण असतो मनाला हळवा करणारा पण त्यासोबतच आयुष्याला नवी दिशा देणारा.
आज तुम्ही सेवानिवृत्त होताय विश्वास होत नाही. तुमच्या आयुष्याची नवी वाटचाल सुखद आणि आरोग्याची जावो
सेवानिवृत्ती हा असा दिवस आहे ज्यावेळी तुम्ही घरी येता आणि तुमच्या आप्तेष्टांना सांगता की, तुम्ही कायम त्यांचे आहात. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अग्निशमन विभागातील दिपक दाणे,जयपिल्ले अन्ना,राजेश कनोजिया,अशोक प्रधान, हनुमान घाटोळे,निलेश सिरसाट, प्रमोद इंगळे,विक्की ठाकुर, वानखडे काका,गजानन दामोदर,उमेश भिरड,जावेद भाई,शैलेश निकोले,अनिल खिरोडकर, रिजवान भाई,क्रिष्णा घाडगे,तसेच मोठ्या संखेने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.