बाळापूर पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाला निरोप

बाळापूर पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाला निरोप

बाळापूर :– पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरत बाळापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी शनिवारी थिरकले. निमित्त होते बाळापूर पोलिस ठाण्यात बसविण्यात आलेल्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाचे .एरवी प्रत्येक सण-उत्सवात, तसेच गणेशोत्सवातही चोवीस तास ‘ऑनड्युटी’ असणारे पोलिस कर्मचारी आपले कुटुंब विसरून गणेशभक्तांचे रक्षण करीत असतात. त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत उत्सव साजरा करता येत नाही. यंदा मात्र बाळापूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना विसर्जनावेळी मनमुराद ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला. दर वर्षीप्रमाणे यंदाही येथे श्री गणेशाची स्थापना करण्यातआली होती. दहाव्या दिवशी पोलिसांना सर्वत्र बंदोबस्त असल्याने बंदोबस्त झाल्या नंतर पोलिस ठाण्यातील गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. त्यानुसार शनिवारी बाळापूर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जूमळे यांनी या अनोख्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची हाळी देत बाप्पांना वाजत-गाजत निरोप देण्यात आला. यावेळी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news