सेवा पंधरवडा निमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाने राबविले स्वच्छता अभियान.
अकोला _ दि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर गांधी जयंती हा कालावधी देशाचे पंतप्रधान विश्व गौरव माननीय नरेंद्र भाई मोदीजी यांच्या निर्देशानुसार व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या सूचनेनुसार स्वच्छता अभियानाचे आयोजन ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ अशोक ओळंबे यांनी स्थानिक अकोला रेल्वे स्टेशन येथील अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी केलें होते यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांचे पूजन करून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व रेल्वे स्टेशन अकोला परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या मlध्येमातून उपस्थित नागरीकांना पंतप्रधान नरेन्द्र भाई मोदींजीचे कार्य अवगत करून स्वच्छतेचे महत्व विशद करण्यात आले कार्यक्रमाला ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव डॉ अशोक ओळंबे नगरसेवक हरीश अलीमचंदाणी भाजपा नेते संजय चौधरी नगरसेवक आशिष पवित्रकार हाजी चांदखा विठ्ठल कावळे, कामगार नेते आशिष ढोमने अरूण पावित्रकार, सचिन बोरेकर, रवींद्र जैन प्रभाकर वानखडे, गजानन बनकर,विजय गीते, आशिष शर्मा जय इंगोले,पवन शेंडे, काजू ललित सेठ आशुतोष काटे,डॉ नरेश बजाज डॉ सागर भांबेरे डॉ अखिलेश अग्रवाल डॉ देवगिरीकर डॉ मयूर अग्रवाल प्रमोद पारीख सोनू उज्जैनकर शेखर शेळके सुरेश अंधारे डॉ संजय धोत्रे भाऊराव साबळे किशोर मानकर सिद्देश मुरारका श्रीकांत एखंडे विजय काकड गजानन गोलाईत संजय लाडविकर, आकाश डोंगरे नितीन बंडlवर जगदीश वाघ यांचेसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते