मनपाव्दारा 1 ऑक्टोंबर रोजी शहरातील विविध भागात एक तारीख – एक घंटा श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली.
अकोला दि. 1 ऑक्टोंबर 2023 – अकोला महानगरपालिका व्दारा शासनाच्या सुचनेनुसार महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत आज दि. 1 ऑक्टोंबर 2023 रोजी ‘‘एक तारीख एक घंटा’’ श्रमदान करून मान्यवरांच्या उपस्थितीत अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वे लाईन, जठारपेठ, नवीन व जुने बस स्थानक, हुतात्मा स्मारक, जनता बाजर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला रेल्वे स्टेशन परिसर, पोलीस लॉन, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर, महाबीज कार्यालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, असदगढ किल्ला, गौरक्षण रोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परिसरांची सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत एक तास शहरातील आमदार, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संघटना तसेच वस्तीस्तर संघ यांच्या वतीने श्रमदानच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली आहे.
यावेळी आमदार रणधीरजी सावरकर, आमदार अमोल मिटिकरी, माजी महापौर विजय अग्रवाल, सौ.अर्चना जयंत मसने, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ.शरद गडाख, मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी, जिल्हाधिकारी अजीत कुंभार, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विलासजी मुंजे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे, मनपा उपायुक्त गीता वंजारी, सह संचालक आरोग्य सेवा एन.एच.एम. डॉ.दुर्योधन चव्हाण, वैद्यकीय अधिक्षिका जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला डॉ.वंदना पटोकार, शहर अभियंता नीला वंजारी, नगर रचनाकार आशिष वानखडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी मनीष शर्मा, मनपा प्रशासन अधिकारी अनिल बिडवे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनेश ऐकडे, मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, नरेडकोचे प्रेसिडेंट सुनिल इन्नानी, झोन कार्यालयाचे सहा.आयुक्त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, दिलीप जाधव, जितेंद्र तिवारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, व्यवस्थापकीय संचालक महाबीज अकोला सचिन कलंतरे, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनेश ऐकडे, दिव्यांग विभाग प्रमुख संजय राजनकर, सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा व मनपा अधिकारी/कर्मचारी यांच्यासह 11 एम ए एच बी एन एन.सी.सी अकोला चे विद्यार्थी, इंडीयन इंस्टीट्यूट ऑफ आर्कीटेक्ट असोसिएशन, अस्तित्व फाऊंडेशन, क्रेडाई, नॅशनल रियल इस्टेट डेव्हपमेंट कॉन्सील अकोला, अजिंक्य बहुउद्देशीय संस्था, इंडीयन इंस्टीट्यूट ऑफ आर्कीटेक्ट, नारी फाऊंडेशन चे पदाधिकारी व सदस्य तसेच माजी उपमहापौर राजेंद्र गिरी, माजी नगरसेवक हरिष आलिमचंदानी, सतीष ढगे, आशिष पवित्रकार, माजी नगरसेविका उषाताई विरक यांचेसह सुविधा वस्तीस्तर संघ, स्वामी समर्थ वस्तीस्तर संघ, नाळंदा वस्तीस्तर संघ, गुणवंत समृध्दी वस्तीस्तर संघ, श्रध्दा वस्तीस्तर संघ, अशोका वस्तीस्तर संघ, हिरकणी वस्तीस्तर संघ, उडान वस्तीस्तर संघ, अश्विनी/संजीवनी/दिपिक्षा वस्तीस्तर संघ, एकता वस्तीस्तर संघ, अष्टविनायक सहेली वस्तीस्तर संघ, सत्यवती वस्तीस्तर संघ, स्त्रीशक्ति वस्तीस्तर संघ, स्वावलंबी/शिवाई/वैष्णवी वस्तीस्तर संघ, माऊली वस्तीस्तर संघ, निर्भया वस्तीस्तर संघ तसेच मनपा अधिकारी/कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी लोकसहभागही खूप आवश्यक असते म्हणून शहरातील नागरिकांनी महिन्यातून एक वेळा म्हणजे एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करून आपले परिसर स्वच्छ ठेवावे तसेच घरातून किंवा प्रतिष्ठानातून निघणारा घनकचरा परिसरात ईतरत्र न टाकता ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्येच टाकावा आणि सिंगल यूज प्लास्टीकचे वापर पुर्णपणे बंद करून सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी यावेळी केले आहे.