राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग व संत गाडगेबाबा संस्थेतर्फे राबविले स्वच्छता अभियान
अकोला – देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी राज्यसमन्वक ईश्वर बालबुधे यांच्याआव्हानाला प्रतिसाद देत अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग अध्यक्ष अनिल मालगे,व संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज पोळा चौक येथील कामगार कल्याण केंद्र परिसर व संत गाडगेबाबा पुतळ्यासमोर स्वच्छता करून तसेच संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला स्वच्छ धुऊन स्वच्छता अभियान राबविले
यावेळी सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेसमोरील व कामगार कल्याण केंद्र व हा परिसर स्वच्छ झाडून घेण्यात आला त्यानंतर अनिल मालगे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला स्वच्छ धुऊन घेतले यावेळी पोळा चौक कुस्ती केंद्राचे संचालक पैलवान प्रशांत खोरे मनपा कर्मचारी गजानन मालगे, रफिक खान, आशिष मालगे, गणेश भुजबले ,अजय चोपडे, संतोष उमाळे,आदित्य मालगे प्रणव मालगे ,यांच्यासह पोळा चौकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम आमचे मार्गदर्शक प्रा. तुकाराम भाऊ बिडकर, आमदार अमोल दादा मिटकरी, महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष यश सांवल, नगरसेवक दिलीप देशमुख ,यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलाअशी माहिती गणेश भुजबले यांनी दिली.