राज्यसभा सदस्य खासदार, जेष्ठ पत्रकार कुमार केतकर हिवरखेडात साधणार संवाद
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
राज्यसभा सदस्य खासदार, जागतिक स्तरावरील जेष्ठ पत्रकार कुमार केतकर हे हिवरखेड मधील पत्रकार व नागरिकांसोबत दुपारी ४ ते ४.३० या दरम्यान संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेस क्लब व संवाद परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या संवाद कार्यक्रमांतर्गत प्रथमच हिवरखेड नगरीत आगमन होत असलेले खासदार कुमार केतकर हे हिवरखेडकरांची स्नेहभेट घेऊन विविध सामाजिक समस्या व देशहिताय मुद्द्यावर संवाद साधणार आहेत. खासदार कुमार केतकर हे जेष्ठ पत्रकार असून त्यांनी जागतिक ज्वलंत प्रश्नावर आपले विचार मांडून राजकारण समाजकारण पत्रकारिता क्षेत्रावर आपली वेगळी छाप पाडली आहे. तरी पत्रकार व नागरिकांनी दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक ४ वाजता भोपळे शैक्षणिक संकुल, सोनवाडी फाटा, हिवरखेड येथे उपस्थित राहून,या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रेस क्लब व संवाद परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.