अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचा सुतकताई यज्ञ व चरखा प्रशिक्षण

अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचा सुतकताई यज्ञ व चरखा प्रशिक्षण

अकोला— राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिड यांचे अध्यक्षतेखाली गांधी जवाहर बागेत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सूतकताई यज्ञ संपन्न झाला. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार ,कापूस ते कापड अभियान प्रमुख प्रल्हादराव नेमाडे, सर्वोदय मित्र भाऊराव गावंडे यांनी सुतकताई, वस्त्रस्वावलंबन, कापूस ते कापड अभियान, गांधी विचारावर मार्गदर्शन केले. विदर्भ भूदान मंडळाचे माजी सदस्य वसंतराव केदार यांनी अंबर चरखा दुरुस्ती विषयी सप्रयोग उद्बोधन केले कवी रामराव पाटेखेडे यांनी गांधीजी वरील भजने सादर केली सर्वोदयी कार्यकर्ते नाणेसंग्राहक शंकरराव सरप ,वासुदेवराव काळमेघ ,केशवराव कोठाळे, रामचंद्र राऊत ,साहेबराव तायडे, सुशीला मोहिते ,आत्माराम शेळके, प्राध्यापक सुहास उदापूरकर ,महेश वसंतराव आढे, जय कृष्ण वाकोडे अकोट, श्रीकृष्ण विखे, विलास बोराळे, देविदास नेमाडे ,दत्तात्रय पत्की, अंबादास वसू ,शेळके गुरुजी सहदेवराव आगळे,
सौ सुमित्रा निखाडे ,सविता शेळके यांनी चरख्यावर सूतकताई करून अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्रीजींना कृतीशील आदरांजली वाहिली .
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, प्रा.दत्तात्रय भाकरे,देविदास नेमाडे , गुरुचरण ठाकुरराम शेकोकार ,निलेश पागधुणे ,उमादेवी अग्रवाल, अतुल पाटील ,अपर्णा अशोकराव अब्दे ,बार्टीचे मनीष गिरधर चोट मल ,उपेंद्र लजपतराव गावंडे, एडवोकेट वैशाली गवळी, गजानन पाटील डिवरे आनंदराव गोठाकडे ,प्रा.गणेश कावरे, गणेश चंद्र तिवारी सुरेश महिंद अशोक रामटेके डॉक्टर जगन्नाथ शेटे डॉक्टर नालाट धनंजय नालट यांनी सूतकताई यज्ञास भेट दिली. कार्यक्रमाचे संचालन अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे सचिव डॉक्टर मिलिंद निवाणे यांनी केले. आभार प्रदर्शन सर्वोदय मित्र अनिल मावळे यांनी केले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news