महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अकोला, दि 2 : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहामध्ये आज अभिवादन कार्यक्रम झाला.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर, अतुल सोनवणे, शिवहरी थोंबे, मोहन साठे, सुमेध आठवले, अविनाश चव्हाण, योगेश इंगळे, विधी अधिकारी श्री. कंकाळे, नागोराव वाघमारे यांनीही अभिवादन केले.