अकोला जिल्हा पारसच्या राख विक्रीला स्थगिती नाही
हायकोर्ट :साई कंपनीने केली होती मागणी
प्रतिनिधी बाळापुर
अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधील 90 हजार मॅट्रिक टन पाॅन्ड अँश बालाजी वीट सेंटर व इतर चौघांना विकण्याच्या आदेशाला अंतरीम स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमान्य केली साई पाॅन्ड अँश ट्रान्सपोर्ट कंपनीने ही मागणी केली होती न्यायमूर्तीद्दाय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांनी महानिर्मिती कंपनीला हा दिलासा दिला साई कंपनीने 419 रुपये प्रति मॅट्रिक टन दराने 8 लाख 50 हजार मॅट्रिक टन पाॅन्ड अँश खरेदीची बोली लावली होती ती बोली मंजूर करण्यात आली पण कंपनीला केवळ 7 लाख 20 हजार मॅट्रिक टन पाॅन्ड अँश विक्रीचा आदेश जारी करण्यात आला तर इतर दोन कंपन्यांना समान दराने 90 हजार मॅट्रिक टन पाॅन्ड अँश देण्यात आली त्यानंतर उरलेली आणखीन 90 हजार मॅट्रिक टन पाॅन्ड अँश बालाजी वीट सेंटर व इतर चौघांना देण्यात आली त्या संदर्भात 1 ऑगस्ट 2023 रोजी आदेश जारी करण्यात आला त्याविरुद्ध साई कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी प्रकरणावर येत्या 12 ऑक्टोबर रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे महानिर्मितीतर्फे अँड .मोहित खजांची तर बालाजी वीट सेटरसह इतरांतफे अंड. महेश धातक यानी कामकाज पाहिले