प्रसिद्ध कवयित्री सुप्रिया गोटेकर धुळे येथे सन्मानित
बोरगाव मंजू – धुळे येथे संपन्न झालेल्या कवी संमेलना मधे अकोला जिल्ह्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री सुप्रिया गोटेकर ह्या सन्मानित झाल्या आहेत मातोश्री सभागृह जे.आर सिटी हायस्कूल धुळे येथे दि.१ ऑक्टोंबर संध्याकाळी कवित्री संमेलन संपन्न झाले यात गोटेकर यांना सन्मानित करण्यात आले.
ज्ञानाई धनाई सांस्कृतिक व साहित्यिक मंडळ धुळे आयोजित ज्येष्ठांचा सन्मान नवोदितांना प्रोत्साहन, दिव्यागांना प्राधान्य व महिलांचा आदर या अनुषंगाने राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ नानासाहेब पवार, कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभाताई चौधरी, ह्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सुप्रसिद्ध कवित्री सुप्रिया गोटेकर यांना सुप्रसिद्ध कवयित्री म्हणून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला अनेक गणमान्य मान्यवर उपस्थित होते.