चोहोटा बाजार येथे प्रहार सेतू व प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
मा मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या शुभहस्ते . प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसु व मान्यवरआज प्रहार सेतू व प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन चोहोटा बाजार येथे संपन्न झाले त्यावेळी आमदार बच्चू कडू यांनी चोहोटा परिसरातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या अपंगांच्या व्यथा मांडण्यासाठी न्याय मिळावा या उद्देशाने या सेतू केंद्राचे व कार्यालयाचे लोकार्पण करता वेळी प्रतिपादन केले. तसेच प्रहार शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन भाऊ खवले व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर दादा पाटील मोडक हे अनेकांच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवतील व त्यांना न्याय मिळवून देईल मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे यावेळी प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी यावेळी चोहोटा परिसरातील नागरिकांना केले