क्षयरुग्ण शोध मोहिमेचे संयुक्तपणे व्यापक प्रमाणात उद्घाटन संपन्न.
अकोला दि. 2 ऑक्टोंबर 2023 – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत अकोला जिल्ह्या मध्ये जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिम दि. 3 ऑक्टोंबर ते दि. 13 ऑक्टोंबर 2023 पर्यत मोठया प्रमाणात मोहिम राबविण्यात येणार आहे. शहर क्षयरोग कार्यालय महानगरपालिका अकोला अंतर्गत भरतीया टियु पथक येथे प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहिम चे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनुप चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ निखिल लहाने, एमओडीटिसी डॉ. राधा जोगी, डीआरसीएचओ डॉ. विनोद करंजीकर, यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ बळीराम गाढवे, यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन संयुक्त रित्या शोध मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सक्रिय शोध मोहिमेमध्ये नागरीकांनी सहकार्य करावे असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये क्षयरोगाची लक्षणे असणा-या व्यक्तीचे रोगनिदान दवाखान्यात करण्यात येते बरेचसे क्षयरुग्ण खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपचार घेत असतात. केंद्र सरकारतर्फे या क्षयरुग्णाचे नोटीफीकेशन शासनाकडे करण्यासाठी आदीसुचना जारी करण्यात आली असून त्यामुळे काही प्रमाणात क्षयरुग्ण नोंदणीमध्ये अल्पशः वाढ झालेली आहे. जोखीमग्रस्त घटकांमध्ये फुप्फुसाचा क्षयरोग असणारे रुग्ण यांना होणा-या त्रासामुळे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे. परिणामी संसर्गाची साखळी अंखडीत राहण्यासाठी हे रुग्ण हातभार लावत आहे.
वरील वस्तुस्थिती पाहता केंद्रशासनातर्फे अदयापही क्षयरोग निदानापासुन वंचीत असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटी द्वारे शोधुन काढण्यासाठी दिनांक 3 ते 13 ऑक्टोंबर 2023 मध्ये ए.सी.एफ. आयोजीत केले आहे. जोखीमग्रस्त लोकसंख्याची निवड झोपडपटटी, कारागृहातील कैदी, वृध्दाश्रम, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, निर्वासिताची छावणी, रात्रीची आश्रयस्थाने एम सॉग ने निवडलेले एचआयव्ही अतीजोखीम गट, बेघर, रस्तावरील मुले, अनाथालय मागील २ वर्षापर्यंत टिबी रुग्णाचे कॉन्टक्ट असलेले व्यक्ती, निराधार असलेले घरे, पेड्राटिक्स, टिबी रुग्णाचे कॉन्टक्ट इत्यादींचा समावेश राहणार आहे.
क्षयरोगाची लक्षणे दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त मुदतीचा ताप, मागील तीन महिन्यात वजनात घट, मागील सहा महिन्याचा कालावधीत कधीही थुकींबाटे रक्त पडत असल्यास, मागील एक महिन्यामध्ये करून घ्यावीत असे छातीत दुखणे, किंवा यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेत असल्यास या प्रमाणे लक्षणे असल्यास पथकाकडून तपासणी करून घ्यावीत असे आव्हान मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनुप चौधरी यांनी केले.
या कार्यक्रमात डॉ. बासिक अली, डॉ. अग्रता फोकमारे, डॉ. सानिया, उमेश पदमने, बसंत उन्हाळे, शिवराज बबेरवाल, आकाश मनवर, हेमंत भाकरे, दिपक पाटील, प्रतिक गाडगे , मनिष गुप्ता, अब्दुल कदिर, श्रीधर सटाले, नितेश वाघमारे, सोनाली रंगारी, सोनाली शिंदे, मनिषा पालममोल, शबाना कालीवाले, सुमित्रा वानखडे, वर्षा पांडे, तबसुम जबीन, अर्चना नागमोत, सुमित्रा चांदुरकर, जयश्री गवई यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राधा जोगी व आभार प्रदर्शन डॉ निखील लहाने यांनी केले.