इंडिया आघाडी नंतर भाजप आणि नरेंद्र मोदी बिथरले आहे…. कुमार केतकर
अकोला : इंडिया आघाडी नंतर भाजप आणि नरेंद्र मोदी बिथरले आहे….म्हणून त्यांनी नको ते मुद्दे उपस्थित केले आहेत….अशी टीका काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केली आहे…तर त्यांना बहुमत मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने ते दडपशाही वाढवत आहेत….असाही केतकरांनी म्हटलं आहे तर ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते…!
राज्य सरकार बेदरकार असल्याचा आरोप नांदेडच्या घटनेनंतर कुमार केतकरांनी केलाय. सरकारच प्रशासनाकडे लक्ष नाही, ही घटना नांदेडसोबत नागपूर आणि ठाण्यातही घडली आहे. आरोग्य यंत्रणेवरील लक्ष उडालं आहे, मात्र कोणताही मंत्री याबद्दल स्पष्ट बोलत नसल्याचा आरोपही केतकरांनी केलाय.
न्यूज क्लिकच्या जवळपास 50 पत्रकारांवर हल्ला झालेला आहे, त्यांच्यावर वाटेल ते मूर्खा सारखे आरोप केलेले आहेत. न्यूज क्लिक हे अत्यंत साहसी चॅनल आहे. त्यामुळे मोदींना धोका वाटतो, त्यामुळे हे प्रकार सुरू असल्याची टीका कुमार केतकर यांनी केलीय, पत्रकारांवर अश्या प्रकारे दबाव आणल्याने त्यांचा आवाज दाबल्या जाईल असं त्यांना वाटत पण अस आतापर्यंत जगाच्या पाठीवर कधीही घडलं नाही. असंही केतकर म्हणाले.