खामखेड ग्रामपंचायत सरपंचाच्या वतीने आयुष्यमान सभा संपन्न
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा
मौजे खामखेड ता. पातूर जि. अकोला येथे सरपंच सौ.नंदाताई विठ्ठल काळे यांनी विशेष ग्रामसभा चे आयोजन केले. त्या ग्रामसभेमध्ये उपकेंद्र शिर्ला,प्रा.आ.केंद्र पातूर अंतर्गत आयुष्यमान सभा घेण्यात आली ,डॉ.विलास शि. इंगोले स.आ.अधिकारी शिर्ला ,यांनी सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करून सर्वाना सविस्तर माहीती दिली.
सर्वाना आयुष्यमान कार्ड व ABHA card – AB Golden card चे फायदे,ते स्वतः काढण्याची पध्दत, आयुष्यमान भारत योजनेतून लाभदायक योजना ,TB मुक्त ग्रामपंचायत ,कुष्ठरोग कार्यक्रम,संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, आयुष्यमान भवः कार्यक्रम अंतर्गत ” निरोगी आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे” ,18 वर्षा वरील सर्व पुरूष मोफत सर्वकष आरोग्य तपासणी कार्यक्रम यामध्ये ,रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग ( टि बी )एच आय व्ही ,हरनीया,पोटाचे विकार, हायड्रोसिल ,पुरुष नसबंदी शस्त्रक्रियाची सुविधा ,तोंडाचा कर्करोग, मनोविकार ,नेत्रतपासणी इ.आजारा बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.अभियान कालावधी दिनांक. 17/09/2023 ते 31/12/2023 पर्यंत राहील, आवश्यकतेनुसार रूग्णना मोफत शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंगीकृत रूग्णालया मार्फत शस्त्रक्रिया करण्यात येतील,त्यानंतर तंबाखु मुक्ती ची शपथ घेण्यात आली .सभेमध्ये वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.सदर सभेत डॉ.श्वेता चव्हाण मॅडम वैघकिय अधिकारी प्रा. आ.केंद्र पातूर.डॉ.विलास शि.इंगोले सर , श्री.प्रदीप मोहोकार आरोग्य सेवक,श्रीमती रेखा सपकाळ आरोग्य सेविका, ग्राम सेवक- गुंडेकर मॅडम,श्री विठ्ठलभाऊ काळे समाज सेवक,व गावातील प्रतिष्ठीत नागरिक हजर होते. अशा रीतीने आज ग्रामपंचायत खामखेड येथे आयुष्यमान सभा पार पडले.