बेरोजगार विध्यार्थी संघर्ष समिती च्या वतीने धडक मोर्चा

बेरोजगार विध्यार्थी संघर्ष समिती च्या वतीने धडक मोर्चा

■ सर्व सरकारी शाळा दत्तक व कंत्राटी पद भरतीचे शासन निर्णय रद्द करण्यात बाबत पातुर तहसीलदार यांना निवेदन

शासकीय शाळांचे खाजगीकरण व शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरणाचे विरोधात बेरोजगार विद्यार्थी संघर्ष समिती च्या वतीने धडक मोर्चा पातुर तहसील कार्यालयावर काढण्यात आला यावेळी धडक मोर्चा ची सुरुवात महात्मा फुले स्मारक लातूर येथून राष्ट्रपिता महात्मा फुले यांना हरपून करून करण्यात आले संघर्ष समिती च्या मोर्चा मध्ये बहुसंख्य नागरिक मोर्चा मध्ये उपस्थित होते सर्व सरकारी शाळा दत्तक व कंत्राटी पदभरतीचे शासन निर्णय रद्द करण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे शासनाने नुकतेच घेतलेल्या दत्तक योजना व शासकीय पदभरती कंत्राटी पद भरतीने करण्याचा निर्णय हा अत्यंत घातक असून तो निर्णय मागे घेण्यात यावा व पूर्वीप्रमाणेच स्पर्धा परीक्षा द्वारे पद भरती करण्यात यावे दत्तक शाळा योजनेचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 पत्र क्रमांक 48डी6 हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा शासनाच्या विविध विभागात कंत्राटी भरती करण्याचे वेळोवेळी घेतलेले निर्णय सुद्धा मागे घेण्यात यावे नियमित प्रमाणे घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा द्वारे पद भरती करण्यात यावी अशी मागणी संघर्ष समितीद्वारे निवेदनाद्वारे करण्यात येत आहे जर शासनाने अन्यायकारक निर्णय मागे घेतले नाहीत तर बेरोजगार विद्यार्थी संघर्ष समिती अत्यंत तीव्रपणे आंदोलन चालूच ठेवेल आणि याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाचे राहील असे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी बेरोजगार विद्यार्थी संघर्ष समिती ला विविध संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे व धडक मोर्चा शहरातील गणमान्य नागरिक विद्यार्थी तरुणी पत्रकार व राजकीय व्यक्तिमत्व प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news