बुलढाणा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतले श्रींच्या समाधीचे दर्शन
शेगांव : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी जाहीर करण्यात आली . या सुधारित यादीनुसार बुलढाणा जिल्ह्याचे पाल्कमंत्रीपद हे दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठकींसाठी अकोल्यात आलेले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव दाखल होऊन श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सूत्र सांभाळली आहेत. सकाळी श्रींच्या चरणी माता टिकल्यानंतर संस्थांच्या वतीने वळसे पाटील यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यानंतर ते बुलढाणा कडे रवाना झाले. तत्पूर्वी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर पाटील यांचे स्वागत संतनगरीत करण्यात आले.