रिकाम्या खुच्यपुढे जलव्यवस्थापनाची सभा

पावसाची मोठी तुट असल्याने आगामी काळात जिल्ह्याला पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन सभेला अधिकारीच गैरहजर असल्याने रिकाम्या खुच्यापुढे सभा घेण्याची वेळ जिल्हा परिषद अध्यक्षांवर आली. समेत गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी, असा आदेश जि.प. अध्यक्ष संगिता यांनी दिला.
अकोला जिल्हा परिषद सभागृहात आयोजित सभेला मोजकेच अधिकारी उपस्थित होते, सभागृहातील इतर खुर्च्या रिकाम्याच होत्या. जिल्हा परिषदांच्या अनेक महत्त्वांच्या सभांना संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित नसतात अनेक विभागांचे प्रमुख त्यांचे प्रतिनिधी म्हणून इतर अधिकाऱ्यांना पाठवतात सभेला उपस्थित असलेले प्रतिनिधी सदस्यां – कडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हे प्रतिनिधी सादर करू शकत नाहीत. त्याचा प्रत्येक जल व्यवस्थापन आणि स्वच्छता समिती सभेला सुरुवात होताच सभागृहातील रिकाम्या खुर्च्या पाहून पदाधिकारी आणि सदस्य संतप्त झाले. यावेळी सभेला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ यांनी दिले. यावेळी
मजीप्राच्या कामाबाबत चौकशीची मागणी,
जलजीवन मिशन अंर्तगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात कामांची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी जलव्यवस्थापन सभेत केली. काम पूर्ण न होताच देयके काढण्यात आल्याचा आरोप यापूर्वीच्या सभामध्ये सदस्यांनी केला होता.