मनपा ‘अमृत कलश यात्रे’ द्वारे लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्‍त यांच्‍या निवासस्थानाहून मृदा (माती) संकलन.

मनपा ‘अमृत कलश यात्रे’ द्वारे लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्‍त यांच्‍या निवासस्थानाहून मृदा (माती) संकलन.

 

अकोला दि. 6 ऑक्‍टोंबर 2023 – ‘माझी माती माझा देश’ अभियानात महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी अमृत कलश रथ यात्रेव्‍दारा घरोघर जाउन माती संकलन करण्यात येत आहे. उपक्रमात आज आमदार अमोलजी मिटकरी, आमदार रणधीरजी सावरकर, मा.जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्‍हा  परिषदच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वैष्‍ण्‍वी बी., मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या हस्‍ते व निवासस्थानाहून तसेच जिल्‍हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्‍या निवसस्‍थानाहून माती (मृदा) संकलीत करून सामुहिकरित्‍या पंचप्रण शपथ घेण्‍यात आली.

        अमृत कलश यात्रेत पुर्व झोन क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्‍त विजय पारतवार, समन्वय अधिकारी गजानन महल्ले, शहर अभियान व्‍यवस्‍थापक गणेश बिल्‍लेवार, संजय राजनकर, प्रमोद गायकवाड, राजेश जाधव, देवेंद्र भोजने, उपअभियंता कृष्‍णा वाडेकर, कनिष्‍ठ अभियंता ऋषिकेश ठाकरे, आकाश शिवनीवार, निखिल पाठक, मनोज गोकटे, प्रतीक कोकाटे, दादाराव सदांशिव, संतोष वेले, रवि खंडारे, गजानन रामटेके, हरीश शेकोकार, विठोबा दाळू, प्रकाश थुकेकर, जय मोरे, अकोला शहर स्‍तर संघ आणि राज राजेश्‍वर वस्‍ती स्‍तर संघाच्‍या  पदाधिकारी तसेच समुदाय संघटक प्रमिला सोनटक्‍के, निता वाकोडे, आशिष जंजाळ आणि पुर्व झोन कार्यालयाच्‍या कर्मचा-यांची उपस्थिती होती.

          हे अभियान देशासाठी जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांना समर्पित आहे. अभियानात शहरातील प्रत्येक परिसरातील नागरिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले.

जिल्ह्यात ठिकठिकाणी माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येत आहे.  ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येतील. त्यानंतर हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या “अमृत वाटिके”त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news