महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील याचा अकोला जिल्हा दौरा
अकोला दि. 06 : महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उद्या शनिवार (दि.7 ऑक्टोबर) रोजी अकोला येथे येत आहे.
त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : शनिवार दि.7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व राखीव व मोटारीने अकोलाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व मा.उपमुख्यमंत्री (गृह) यांच्या आगमन प्रसंगी उपस्थिती. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता जिल्हा नियोजन समिती कडून मंजूर 15 वाहनास उपमुख्यमंत्री यांचे पोलीस विभागाला प्रदान कार्यक्रमास उपस्थिती. उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणाऱ्या शहीद स्मारक लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटलचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती व उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे होणाऱ्या आरोग्य मेळावा व आरोग्य मेळाव्यात स्टेजवरून ग्रामीण रुग्णालय बोरगाव मंजू व शिवापूर उपजिल्हा रूग्णालय भूमीपूजन कोनशीला अनावरण. दुपारी 1 वाजता मोटारीने अकोला विमानतळाकडे प्रयाण.