उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोला जिल्हा दौरा
अकोला, दि. 6 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (दि. 7 ऑक्टोबर) अकोला येथे महाआरोग्य शिबिर व विविध कार्यक्रम होणार आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : विमानाने सकाळी 10.45 वा. शिवणी विमानतळ, अकोला येथे आगमन व तिथेच सकाळी 10.50 वा. जिल्हा नियोजन समितीमार्फत घेतलेल्या पोलीस वाहनांचे लोकार्पण, सकाळी 11 वा. नेहरू पार्ककडे प्रयाण, सकाळी 11.20 वा. नेहरू पार्क येथे आगमन व शहिद स्मारकाचे लोकार्पण
सकाळी 11.45 वा. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण, दु. 12.05 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुख्य कार्यक्रमस्थळ येथे आगमन व महाआरोग्य शिबिर व विविध प्रकल्पांचे उद्घाटन, दु. 1.30 वा. शिवणी विमानतळाकडे प्रयाण, दु. 1.40 वा. शिवणी विमानतळ येथे आगमन व विमानाने प्रयाण.