बस कारच्या अपघातात माजी आमदार सह चार जण जखमी!
राष्ट्रीय महामार्गावर काटेपुर्णा नजीकची घटना
संजय तायडे – तालुका प्रतिनिधी सत्य लढा न्यूज
राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटेपुर्णा नजीक कार व बसचा अपघातात बुलढाणा येथील माजी आमदार विजय शिंदे सह अन्य चार जण जखमी झाले,ही घटना शनिवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी दरम्यान घडली सुदैवाने मोठी हानी टळली,
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणाचे माजी आमदार विजय शिंदे हे आपल्या अन्य सहकारी सह आपल्या कार क्रमांक 28 एम एन 2757 या कार मधुन माजी आमदार विजय शिंदे बुलढाणा यांच्या सह अन्य चार जण अकोला कडून मुर्तिजापूर कडे जात होते, दरम्यान कारंजा आगारातील बस क्रमांक एम एच 40 एन 9718 ही बस कारंजा ते अकोला येथे जात होती, दरम्यान काटेपुर्णा नजीक बस व कारचा समोर समोर अपघात झाला, या अपघातात माजी आमदार विजय शिंदे सह अन्य चार जण गंभीर जखमी झाले,तर बस मधील चार प्रवासी जखमी झाले, सुदैवाने मोठा अपघात टळला, दरम्यान घटनेची माहिती मिळताच काटेपुर्णा येथील माॅ चंडिका माता आपत्कालीन व्यवस्थापन सदस्यांनी मदत केली तर बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर बस सह चालकास ताब्यात घेऊन वृत्त लिहिस्तोर नेमका अपघात कसा झाला व अन्य जखमी कोण ते समजू शकले नाही.