जिल्हा शिक्षण समन्वय समितीने काढला शासनाच्या शिक्षण खाजगीकरण आदेशा विरोधात जिल्हाकचेरीवर भव्य मोर्चा
शासनाने शिक्षणाचे बाजारीकरण केले असून अनेक नवनवीन शैक्षणिक अध्यादेश काढलेत शासनाने नुकतेच 5 सप्टेंबर 6 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर रोजी नवनवीन आदेश काढून शिक्षण क्षेत्रात राबवलेल्या धोरणाच्या विरोधात आज दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा शिक्षण समन्वय समितीने जिल्हाधीकार्यालयावर
भव्य मोर्चा काढून विरोध दर्शविला,यावेळी हजारो शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते.
शासनाने शाळा भांडवलदार व देणगीदारांच्या दावणीला बांधून बाहेरील स्त्रोतांच्या द्वारे भरती करण्यात येऊ नये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान देणे शाळातील शिक्षकांना शिक्षणा व्यतिरिक्त कोणते काम देण्यात येऊ नये राज्यातील नव्याने अनुदानित राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10 ,20 ,30 ,वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे आदी मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.