वंचीत बहुजन आघाडी पातूर तालुका वतीने “श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर न्याय दरबार” चे आयोजन
वंचीत बहुजन आघाडी पातूर तालुका वतीने “श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर न्याय दरबार” चे आयोजन जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा :-डॉ.ओमप्रकाश धर्माळ तालुका अध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी
वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने पातूर तालुक्यातील सर्व जनतेच्या रखडलेल्या कामासाठी दिनांक ११/१०/२०२३ बुधवार रोजी ठीक ११ वाजता स्थळ : पंचायत समिती कार्यालय पातूर नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पातूर तालुका वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर न्याय दरबार चे आयोजन केले आहे यामध्ये सर्व प्रकारच्या अडी अडचणी तत्काळ सोडवल्या जातील त्यामध्ये नागरिकांचे घरकुलाचे प्रश्न,विविध योजना चे अडचणी प्रश्न,पंचायत समिती जिल्हा परिषदे संदर्भातील सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्यात येतील
जनता दरबार मध्ये अकोला जिल्हा परिषदे च्या अध्यक्षा संगीताताई अढाऊ,जिल्हा परिषदे चे उपाध्यक्ष सुनिल फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपालिताई खंडारे, शिक्षण सभापती मायाताई नाईक,महिला व बालकल्याण सभापती रिज्वाना परवीन,कृषी सभापती योगिताताई रोकडे,तसेच पातूर पंचायत समिती चे सभापती सूनिताताई टप्पे,पातूर पंचायत समिती चे उपसभापती इम्रानभाई,तसेच सर्व विभागाचे पातूर व अकोला येथील अधिकारी उपस्थित राहतील आपल्या समस्या ताबडतोब निकाली काढल्या जातील याची तालुक्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन…
डॉ.ओमप्रकाश धर्माळ पातूर तालुका अध्यक्ष, शरद सुरवाडे महासचिव, चंद्रकांत तायडे, युवक आघाडी अध्यक्ष यांनी केले आहे.