अकोला महानगरपालिका क्षेत्रातील वराहांना स्थानांतरीत करण्यासाठी एकुण 1500 वराह पकडण्यात आले.
अकोला दि. 9 ऑक्टोंबर 2023 – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अकोला शहरातील अस्वच्छतेमध्ये मोठ्या प्रमाणात भर पाडणारे तसेच विविध रोगराहीस आमंत्रण देणारे मनपा क्षेत्रातील वराह शहराबाहेर स्थानांतरीत करण्याचे कार्य अकोला महानरपालिका प्रशासनाचे व्दारे सुरू असून मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये आज दि. 9 ऑक्टोंबर 2023 रोजी भगत वाडी, खैर मोहम्मद प्लॉट, गुलजार पुरा, गडंकी रोड, चहाच्या कारखान्या मागील भागातील कर्नाटक येथील चमुद्वारे तगड्या पोलीस बंदोबस्तात जवळपास 1500 वराहांना पकडण्यात आले आहे.
या कारवाईत स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, डाबकी रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती होती.