आठ फुटाचा अजगराला जीवनदान!

आठ फुटाचा अजगराला जीवनदान!

=प्रतिभाताई ठाकरे सह सहकार्यानचा प्रयत्नाना यश

=सलग चार सर्पमित्र यांचा परिश्रमातून केलं सापाला रेस्क्यू

प्रतिनिधी पारस

आज दिनांक रोजी दिनेश घावट यांचे रहाते घरा शेजारी पडक्या घरात त्यांना भलामोठा साप असल्याचे निदर्शनास आले त्यांनी ग्रामस्थांना याविषयी माहिती दिली एवढा विशालकाय साप पहाण्यासाठी ग्रामस्थांची एकच गर्दी झाली असता त्यांनी जवळील सर्पमित्र दीपक केकान यांना साप असल्याची माहिती दिली असता त्यांनी वन्यजीव संवर्धन संस्था पारस चा सर्पमैत्रीन प्रतिभाताई ठाकरे यांना ही माहिती दिली.
साप हा अजगर जातीचा असून तो अंदाजे आठ फूट लांब आहे आपल्या सहकार्याने हा साप पकडता येईल असं त्यांनी यावेळी सांगितले असता प्रतिभाताई यांनी इथून जवळच असलेले वन्यजीव संस्था सदस्य दत्ता मेसरे यांना ही माहिती दिली व सापावर पाळत ठेवायला सांगीतले तसेच सर्पमैत्रीन प्रतिभाताई ह्या क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी पोहचल्या या वेळी साप पकडण्यासाठी त्याचा सोबत वन्यजीव संस्था चे सदस्य दीपक केकान,विक्की खणके,दत्ता मेसरे आदींनी सहकार्य केले व त्या सापास वेवस्थित रित्या रेस्क्यू केले.
या सापाचा बद्दल माहिती सांगत सर्पमैत्रीन प्रतिभाताई यांनी सांगितले की या सापाची अधिकतम लांबी ही पंधरा फुटापर्यंत होत असून याला अजगर किव्हा दगडी अजगर या नावाने ओळखले जाते.या सापाचे इंग्रजी नाव हे इंडियन रॉक पायथन हे आहे.हा वन्यजीव कायद्याच्या परशिष्ट एक या प्रणालीत येत असून हा साप दुर्मीळ तथा या सापास मारल्यास कायदेशीर कारवाई होऊन साप मारणारनार्या वेक्तीवर गुन्हा दाखल होतो.
यावेळी त्यांनी सांगितले की हा साप थंड तथा पाणथळ जागा पसंत करत असून तो भक्षाचा शोधत गावात येतो यावेळी या सापाला न मारता त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच हा साप जरी लांब व अवाढव्य असला तरी हा पूर्णपणे बिनविषारी आहे
अजगर ही प्रजाती आधीच दुर्मीळ असून या प्रजातीच्या रक्षणासाठी आम्ही जनजागृती तथा लोकांना वन्यजीव संवर्धन संस्था मार्फत मार्गदर्शन करतो.
व येणाऱ्या पिढीला अजगर ही प्रजाती ही पहायला मिळावी ज्याप्रकारे डायनासोर नष्ट झाले त्या प्रमाणे हे नष्ठ होऊ नयेत यासाठी आम्ही परिश्रम घेत आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली . या सापाच रेस्क्यू समबंधित पुरेपुर माहिती वन विभाग चे वनपाल गजानन इंगळे सर तसेच वन विभाग चे संघपाल तायडे यांना देण्यात आली असता त्याचे मार्गदर्शनात या सापाला पकडण्यात आले.  व वनक्षेत्रात मुक्त करण्यात आले यावेळी वन विभाग अकोला चे अधिकारी तथा वन्यजीव संस्था पारस चे सदस्य उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news