शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गांधी चौकामध्ये लावलेल्या बूथ मूळे अपघात घडण्याची

अकोला शहरातील प्रमुख चौकामध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुविधा व्हावी या उद्देशाने महापालिका अकोला च्या सौजन्यातून बुथ ठेवण्यात आले आहे , अकोला शहरातील गांधी चौकामध्ये सुद्धा दहा नंबरचे बूथ ठेवण्यात आले असून हे पोलिसांचे बूथ रहदारी करणाऱ्या वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनत चालले आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रत्येक चौका चौकात रहदारी नियंत्रण करण्यासाठी कर्मचारी तैनात केली जातात. परंतु याच शहर वाहतूक नियंत्रण शाखेने लावलेल्या बूथ मुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी हे बूथ उभे करण्यात आले होते त्या ठिकाणाहून उचलून दुसऱ्या जागी जेथे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो त्या ठिकाणी उभे करण्यात आले. तहसील कार्यालयाकडून येणाऱ्या वाहनधारकांना जर सिटी कोतवाली कडे जायचं असेल अशा व्यक्तींना समोरचे कुठलेही वाहन या बूथमुळे दृष्टीस पडत नाही.

अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे यासोबतच गांधी मार्ग हा वनवे मार्ग असताना या मार्गावर टू -वे वाहतूक सुरू असते. एवढेच नव्हे तर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे त्यामध्ये आता या बूथने सुद्धा भर घातली आहे. दुर्गा माता मंदिरासमोर एवढी मोठी जागा उपलब्ध असताना. शहर वाहतूक नियंत्रण शाखेला रस्त्यावर हा बूथ ठेवण्याचा शहाणपणाचा सल्ला कोणी आणि का दिला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. गांधी चौकातील दुर्गा माता मंदिरासमोर अतिक्रमण आहे या अतिक्रमण धारकांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे. पोलीस व महानगरपालिका रस्त्यावरील वाहतुकीला अडथळे निर्माण करणारी अतिक्रमणे काढत असतात परंतु या ठिकाणी शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर अतिक्रमण करून बूथ लावल्यामुळे यांच्यावर कोण कारवाई करणार अशी विचारणा सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक चौकात ऊन, वारा, पाऊस व नैसर्गिक आपत्ती पासून बचावा करिता महापालिका व पोलीस प्रशासनाने केलेला हा प्रयत्न चांगला असला तरी योग्य ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना कोणतेही अडचण निर्माण होणार नाही अशा ठिकाणी हे बूथ ठेवल्यास याचे स्वागत सर्वसामान्य नागरिक ही करतील. प्रशासन हे या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्य करीत असते. प्रशासनासह पोलीस विभागाकडे सर्वसामान्य जनता ही मोठ्या आशेने बघत असतात. परंतु एखाद्याने खोडकरपणा करीत जर असे कृत्य केले असेल तर त्याचाही विचार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. गांधी चौकात लावण्यात आलेल्या बूथ मुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे त्यामुळे हा भूत योग्य त्या ठिकाणी ठेवून वाहतूक सुरळीत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news