जवाहर नगर परिसरात प्राध्यापकाने त्यांच्या घरात स्वतःचा गळा कापून केली आत्महत्या ?

जवाहर नगर परिसरात प्राध्यापकाने त्यांच्या घरात स्वतःचा गळा कापून केली आत्महत्या ?

अकोला: जवाहर नगर परिसरातील रहिवासी प्राध्यापक गजानन कुलकर्णी यांनी आपला स्वतःचाच गळा कापून शौचालयामध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जवाहर नगर परिसरातील चायना गेट च्या बाजूला असलेल्या सुमन प्लाझामध्ये पहिल्या मजल्यावर प्राध्यापक गजानन कुलकर्णी आपल्या पत्नी व मुलासह राहत होती. एक दिवस आधी कुटुंबामध्ये वाद झाल्यानंतर ते घरून निघून गेले होते, या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. आज 11 ऑक्टोबर रोजी ते स्वतःच घरी परत आले होते, परंतु घरी परत आल्यानंतर त्यांनी चार ते साडेचार वाजता च्या दरम्यान घरामधील शौचालयामध्ये आपला स्वतःचा गळा व हात कापून आत्महत्या केली. बराच वेळ झाला नंतरही ते बाहेर न आल्यामुळे पत्नी व मुलांने शौचालयाचा दरवाजा ठोकला परंतु आत मधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला सदर प्रकाराची माहिती दिली. सदर घटना ठिकाणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला. शौचालयाचा दरवाजा आत मधून बंद होता, पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा दरम्यान दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला असता गजानन कुलकर्णी शौचालयामध्ये खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. सिव्हिल लाईन पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. प्राध्यापक गजानन कुलकर्णी यांनी आत्महत्या का केली अद्याप कारण समजू शकले नसून पुढील तपास सिविल लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news