अण्णासाहेब कोरपे जनशताब्दी महोत्सव समापन समारोह व सहकार मेळावा
अण्णासाहेब काँग्रेस नव्हें तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. काळया आईचे इमान राखणाऱ्याना साथ द्या.
अकोला: आज खाजगीकरण वाढायला लागले असून शासकिय शाळा खाजगी कंपन्या व्यक्तींना दत्तक देण्याचे काम झाल्यास शासकिय शाळांमधे वैयक्तिक हस्तक्षेप वाढेल.आज सरकारची शेती विषयक धोरणे चुकीची आहेत.काळया आईशी इमान राखणाऱ्याना सर्वांनी साथ दिली पाहिजे, शेती व शेतकरी संपन्न होणें काळाची गरज असून यासाठी सहकार चळवळ अधीक मजबूत होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले ते अकोला येथे अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी महोत्सव समापन समारोह व सहकार मेळाव्यात बोलत होते.
यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आभासी पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांनी अण्णासाहेब कोरपे यांचे सहकार क्षेत्रातील योगदान व शेतकरी समृध्द संपन्न कसा होईल यासाठी केलेला प्रयत्न तसेच ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्था विचारांचा केन्द्रबिंदू ठरला असल्याची भाबना बोलताना व्यक्त केली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आयोजित सहकार मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी गृहमंत्री अनिल देशमुख अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोष कोरपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शेती,सहकार क्षेत्रातील अण्णासाहेब कोरपे यांचे योगदान मोठे असून कापुस दिंडीद्वारे त्यानी कापुस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दर कसा मिळेल यासाठी आयुष्यभर काम केले.कापुस आयात करण्याचा निर्णय आज देशात घेतला जातो.आज कापसाचे उत्पादन कमी झाले आहे.सोयाबीनची परिस्थीती आज वाईट आहे.
असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली.
कृषी सहकार शिक्षण क्षेत्रातील नेते अकोला वाशिम जिल्हा बँकेचे शिल्पकार सहकार महर्षी डॉ.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समापन समारोह व सहकार मेळावा अकोला क्रिकेट क्लब मैदानावर संपन्न झाला.यावेळी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, केंद्रिय परिवहन मंत्री नितिन गडकरी आभासी पद्धतीनें उपस्थीत होते.तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजीमंत्री गुलाबराव गावंडे, माजीमंत्री सुभाष ठाकरे, माजीमंत्री अझहर हुसेन, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख,आमदार अमित झनक, आ. सरनाईक, आ. नितिन देशमुख, शास्त्रज्ञ, डॉ चारूदत्त मायी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर कानकिरड,जेष्ठ संपादक प्रकाश पोहरे
काँगेस नेते हिदायत पटेल,रमेश हिंगणकर, महादेवराव भुईभार,अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे,डॉ सुभाष कोरपे यांच्यासह अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक उपस्थीत होते.
यावेळी आण्णासाहेब कोरपे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यानी केले,शास्त्रज्ञ, डॉ चारूदत्त मायी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विचार व्यक्त केले
यावेळी अण्णासाहेब कोरपे यांच्या जीवनावरील चित्रफित दाखवण्यात आली. अण्णासाहेब कोरपे यांच्या जीवनावर आधारित ‘निराकारांचा आकार’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन ॲड. अनंत खेळकर यानी केलें . आभार प्रदर्शन रमेश हिंगणकर यानी केले