मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व -२ ची उपविजेती ठरली, अकोल्यातील श्रुती रवीप्रकाश भांडे

दहीहंडा: (प्रतिनिधी: दिपक भांडे)
नुकतेच स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील सुरेल गाण्याची मैफल मी होणार सुपरस्टार. छोटे उस्ताद पर्व -२ मध्ये अकोला मधली श्रुती भांडे ने ऊपविजेते पद मिळवल्या बद्दल श्रुती वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शनिवार रविवार रात्री संगीताची अनुभूती आणि दिवसभरातील मरगळ झटकायची म्हटले की स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद मधील लहानग्या उस्तादांचे गायन ऐकले तसेच त्यांचे निरागस भाव बघितले की या लहानग्या गायकांमध्ये मन हरपून जात असते. अंत्यंत लोकप्रिय असलेल्या या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील श्रुती रविप्रकाश भांडे या मुलीने उपविजेतेपद पटकावले त्या मुळे आनंदाचा कौतुकाचा वर्षाव तिच्यावर होत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील म्हातोडी हे आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव. आजोबा भगवान भांडे हे संगीत शिक्षक होते. वडिलांनाही संगीताची आवड त्यामुळे श्रुतीला वंशपरंपरेने गाण्याचा वारसा लाभला हे जरी खरे असले तरी तिचे गाण्यावर चे प्रेम तिला मिळालेला आवाज हि दैवी देणगीच म्हणावी लागेल स्टार प्रवाह वरिल मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व -२ मध्ये तिला उपविजेते पद मिळाले तशी तर ती विजेते पदाची प्रमुख दावेदार होती असे बहुतांश प्रेक्षकांचे मत होते. जरी टीव्ही
‘मी छोटे उस्ताद चॅनल चा मते तू उपविजेती ठरली तरी आमच्या साठी तूच विजेती आहेस अशी प्रतिक्रिया बऱ्याच श्रोतेवर्गाकडून आली. तिचे श्रुती भांडे ऑफिशियल या नावाने फेसबुक व इंस्टाग्राम वर पेज आहे. तिच्या गायनाचे तसेच हार्मोनियम वादनाचे व्हिडिओज ती त्यावर अपलोड करत असते.. जिल्ह्यातील सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे..