अकोला जिल्ह्यात आलीशान गाड्यांमधून गोवंशीय जनावरांची चोरी करणारी टोळीचा स्थानीक गुन्हे शाखा, अकोला कडुन पर्दाफाश!

अकोला जिल्ह्यात आलीशान गाड्यांमधून गोवंशीय जनावरांची चोरी करणारी टोळीचा स्थानीक गुन्हे शाखा, अकोला कडुन पर्दाफाश!

जिल्हयातील ०७ पोलीस स्टेशन मधील १३ गुन्हयांची उघड, ०७ आरोपी निष्पन्न!

लाखोंचा मुद्देमाल हस्तगत ‘

अकोला शहरातुन तसेच ग्रामीण भागातुन गोवंश चोरीचे गुन्हे घडत असल्याने, सदर गोवंश चोटीदर नियंत्रण मिळवीण्याटी, पोलीस अधीक्षक अकोला यांनी स्थागुशा अकोला यांना आदेशीत केले होते. स्थागुशा प्रमुख श्री. शंकर शेळके यांनी त्याचे अधिनस्त अधिकारी व अमंलदार यांना गोवंश चोरी संदर्भात आगावु माहीती काढून गोवंश चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्या बाबत आदेशीत केले होते.

सपोनि. कैलास डी. भगत व त्यांचे पथक अकोला शहर व ग्रामीण भागातील गोवंश चोरी बाबत माहीती काढण्यासाठी गुप्त बातमीदार नेमण्यात आले होते. तसेच ज्या ठिकाणावरून गोवंशाची चोरी झाली होती. त्या भागाची पाहणी करून CCTV फुटेज व ईतर तांत्रीक बाबीचे विश्लेषन करून व पडताळणी करण्यात आली होती. या दरम्यान चार चाकी ईनोवा व झायलो या सारख्या आलीशान वाहनातून गोवंशीय जनावरांची चोरी केली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. यावर गुप्त बातमीदार नियुक्त करून व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे अधीक माहीती घेतली असता, अकोट फाईल भागातील, सोळाशे प्लॉट अकोला येथे राहणारा शेख अदनान शेख युसूफ कुरेशी हा त्यावे साथीदारासह त्याचे मालकीच्या झायलो आणि ईनोवा या वाहनांच्या सहायाने गोवंशीय जनावराचे चोरी करत असल्याचे माहीती पडले. या वरून पो. नि. श्री. शंकर शेळके यांचे मार्गदर्शनात स्थागुशा अधिकारी व अमंलदार यांनी सापळा खुन झायलो गाडी क्रमांक MH-04-GD-0126 हि गाडी ताब्यात घेतली. तिची पाहणी केली असता तिचे आतील सीट पुर्ण पणे काढून टाकुन आतील बाजूस लाकडी पट्या लावलेल्या होत्या तसेच तिच्यामध्ये संपुर्ण शेन पडलेले असुन तिची आतील रचना गोवंशीय जनावरे चोरी करण्याचे दृष्टीने करण्यात आली होती. सदर गाडी जप्त करण्यात आली. अधिक चौकशी वरून सदर गाडी ही १) शेख अदनान शेख युसूफ कुरेशी वय २१ वर्ष रा. सोळाशे प्लॉट, अकोट फाईल अकोला याची असल्याचे निष्पन्न झाले. व तो गोवंश चोरीमधील मुख्य आरोपी असुन त्याने त्याचे साथीदार नामे २) मोहम्मद रोशन शेख मुसा वय १८ वर्ष, व्यवसाय मजुरी रा. जब्बार किराणा जवळ मच्छी मार्केट, अकोला (३) युसूफ खान रहीम खान वय २१ वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर रा. पुरपिडीत क्वॉटर सी. टी बेकरी जवळ, अकोट फाईल, अकोला ४) मोहम्मद अबुजर मोहम्मंद हनिफ कुरेशी वय १७ वर्ष रा. मच्छी मार्केट, मोहम्मंद अली रोड, अकोला ५ ) शेख रेहान शेख रशीद वय २० वर्ष रा. पिंजारी गल्ली, कच्छान मस्जीद जवळ, अकोला यांच्या मदतीने गोवंशीय जनावरांची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. सपोनि कैलास डी. भगत स्थागुशा व त्यांचे पथक यांनी सदर आरोपीतांना ताब्यात घेवून कौशल्यपुर्ण पध्दतीने विचापूस केली असता त्यांनी गोवंशीय जनावरांची चोरी केल्याचे मान्य केले.

सदर आरोपीतांनी, मुर्तीजापूर, अकोट, उरळ, सिव्हील लाईन, अकोट फाईल, डाबकी रोड, एम.आय. डी. सी या पो.स्टे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणाहून गोवंशीय जनावरांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर टोळी ही दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी ईनोवा आणि झायलो या आलीशान गाड्यांने जावून गोवंशीय जनावरे चोरी करून या वाहनाचे साहायाने त्याची वाहतुक करून त्यांची कत्तल करून विक्री करीत असल्याचे तपासादरम्याण निष्पन्न झाले आहे. या आरोपीतांकडून अकोला शहर व परिसरात गोवंशीय जनावरे चोरीचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मधील
१३ गुन्हे उघड करण्यात आले आहे. या आरोपीतांकडून गुन्हयात वापरलेली वाहन महिंद्रा झायलो गाडी क्रमांक MH-04 GD-0126 कि अं७,००,०००/- रू एक होंडा कंपणीची शाईन मोटर सायकल क्रमांक MH-30-BN-6322 कि ८०,०००/-रू आणि एक होंडा कंपणीची युनीकॉन मोटर सायकल क्रमांक MH-30-A5-7247 असा क्रमांक असलेली किअं ९०,०००/-रू आणि गुन्हयात वापरलेले ०२ मोबाईल किअं ११,०००/- रु. नगदी ३,०४,५००/-रू अश्या प्रकारे एकुण ११,८५,५००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी कायदेशीर कार्यवाही कामी पो.स्टे सिव्हील लाईल अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील काही आरोपी है फरार असुन त्यांना अटक करणे बाकी आहे. सदर गुन्हयामध्ये वाढीव कलम समाविष्ट करण्यात येत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. संदीप घुगे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, पो. नि. श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला ये सपोनि. श्री कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव ए. एस. आय. गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, दशरथ बोरकर पी. हवा. प्रमोद ढोरे, भारकर धोत्रे, सुलतान पठाण, रवी खंडारे, पो.ना, महेंद्र मलिये, अविनाश पावपोर, एजाज अहेमद, विशाल मोरे, पो. अं. अमोल दिपके, राहुल गायकवाड, सुमीत राठोड, स्वप्नील चौधरी, चालक प्रशांत कमलाकर, मोहम्मद नफीस तसेच आशिष आमले सायबर सेल, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news