पातूर शहरात संभाजी चौकात अपघात जडवाहणाच्या चपेट मध्ये येऊन एका इसमाचा जाग्यावर मृत्यू
बाळापूर ते पातूर कडे येनारा GJ 18 AX 4167 क्रमांक असलेल्या ट्रक च्या मागच्या चाकामध्ये येऊन एका व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला आहे अद्याप पर्यंत या व्यक्तीची ओळख पटली नसून हातावरील गोंदलेल्या नावाने गणेश नाव समजले जात आहे.
पातुर शहरातील अवैध अतिक्रमणामुळे व बिना परमिट प्रवासी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे व ही वाहने भर रस्त्यावर प्रवासी सवारीच्या शोधामध्ये उभी राहतात त्या मुळे पायदळ व्यक्तीला मुख्य रस्त्यावरून चालल्याशिवाय पर्याय नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही याकडे पातुर प्रशासनाचे दुर्लक्ष असून पोलीस प्रशासन बिना परमिट वाहनांवर कुठल्याही प्रकारे कारवाई करत नसल्याने वाहन धारकांना शेय मिळत आहे हा युवक अतिक्रमाचा बळी ठरला का अशी चर्चा पातुर शहरात होत आहे यावेळी पातुर पोलिसांनी युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला व शवइच्छेदनाकरिता अकोला जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला व पुढील तपास पातुर पोलीस करीत आहेत.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा