मुंगीलालच्या गरबा महोत्सवात एआर संगीत टीमचा ढोल व बेंजोचा संगीतमय सुरताल दि.15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत चालणार भक्तिभाव व पारंपरिक संस्कृतीचा रंगारंग गरबा
अकोला-श्री गुजराती नवरात्री महोत्सव समितीच्या वतीने महानगरातील मुंगीलाल विद्यालयाच्या प्रांगणात रविवार दि 15 ऑक्टोबर ते 22 ऑकटो.पर्यंत गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला असून महोत्सवाचे हे एकोणवीस वर्ष आहे.यावर्षीही या गरबा महोत्सवात नागरिकांसाठी गुजराती विश्वाची अस्सल सांस्कृतिक लोकधारा गरब्याच्या रूपाने बघावयास मिळणार असल्याची माहिती स्थानीय मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात शुक्रवारी आयोजित गरबा महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत समितीचे हरीश लाखानी यांनी दिली.समितीचे अध्यक्ष वालजीभाई पटेल,हेमेन्द्र राजगुरू,मनोज भीमजियानी,दिनूभाई सोनी,आशीष वखारीया,अरविंद पटेल,कपिल ठक्कर,
प्रकाश लोढिया,महिला मंडळाच्या शीतल रुपारेल,अनिषा वखारिया,नीलिमा वोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावर्षी ही दर्शकांचा प्रवेश हा पारंपरिक गेट मधून न होता तो मेन हॉस्पिटल समोरील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून दिल्या जाणार आहे.यात आतच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आली असून भव्य स्टेजवर वीस वर्षांपासून राज्यात पारंपरिक गरबा संगीत व गीत गाणारी अनुभवी अरुण मोदी व श्वेता मोदींची एआर संगीत टीम बेंजो व ढोलकीच्या पारंपरिक वाद्यांवर संगीत उधळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मातेच्या पूजा अर्चना व जागरणाचे प्रतीक म्हटल्या जाणाऱ्या या नवरात्राच्या गरबा महोत्सवात घट स्थापना,दैनिक चंडीपाठ,दैनिक आरती,पूजन करण्यात येणार असून अष्टमी दिनी प्रांगणात होम हवन करून शुचिर्भूतता निर्माण करण्यात येत येणार आहे. यावेळी पुरुष गरबा प्रेमी साठी गरबा खेळण्याची विशेष व्यवस्था प्रांगणात करण्यात आली असून मातृशक्तीने अस्सल भारतीय पारंपरिक पेहरावतच प्रांगणात गरबा खेळून भारतीय संस्कृती व सभ्यता जपावी तसेच युवावर्गानेही मातृशक्तीच्या या जागरण महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत समितीला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.या गरबा महोत्सवात मातृशक्तीची सुरक्षितता व आसन व्यवस्था संदर्भात समितीने चोख व्यवस्था निर्माण केली असून पुरुष वर्गासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था राहणार आहे.तसेच प्रवेश हा पासेस द्वारेच देण्यात येणार आहे.प्रांगणात सीसीटीवी व महिला गार्डची व्यवस्था राहणार आहे. महोत्सवात स्वतंत्र अल्पोपहार झोन असून यात स्वादिष्ठ व्यंजनासोबतच आनंद मेळ्याच्या धर्तीवर विविध प्रकारच्या खेळांचे स्टाल लावण्यात येणार आहेत.उत्तम विद्युत व ध्वनी व्यवस्था हे या महोत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे.महोत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी प्रशासनाच्या सूचना व निर्देशांचे वेळोवेळी पालन करण्यात येणार आहे. गरब्यात यावर्षीही भरपूर व आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत.तसेच उत्तम गरबा खेळणाऱ्या महिला-मुलीस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा महोत्सव सर्वसमावेशक व्हावा यासाठी समितीच्या वतीने ख्यातनाम मान्यवरांना महोत्सवात निमंत्रित करून त्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. दि.15 ऑक्टोबर रोजी घट स्थापना दिनी सायं.7 वा. मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या गरबा महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यास व नित्य गरबा बघण्यास नागरिक महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.आभार हेमेन्द्र राजगुरू यांनी मानले.या पत्रकार परिषदेत समितीचेविनोद धाबलिया,भरत मकवाना,किरीट शाह,विशाल शहा, दर्शन शहा, पियुष संघवी, अमरीश पारेख,संजय कोरडिया, सुनील कोरडिया, योगेश वोरा, प्रफुल सोनी, दिनेश मेहता,जगदीश पटेल,भारतेंदू भाटिया, पियुष कोरडिया,जयंत संघवी,मुकेश कोठारी, राजीव राजगुरू, शैलेश पटेल,हिरेन सोनी,नर्मदा पटेल, हिना राजगुरू, छाया लाखानी, संगीता भीमजियानी, चारू सोनी, धर्मिष्ठा वखारिया,इंदू जोशी, शारदा परमार, मधु कुरानी, दिना शाह,भावना वाघेला, हंसा पटेल, गीता भंडारी, वंदना भाटिया, ज्योती जोशी किरण मेहता, रमाबेन सोनी,दीपा धाबलिया,पारुलबेन मकवाना, अल्पाबेन पटेल,प्रज्ञा पंचमीया, दीपिका ठाकूर, पार्वती पटेल,नमिता मेहता, जागृती लोढिया,डॉ तृप्ती भाटिया, नैना कारिया,मनीषा जोशी,शोभा गांधी समवेत बहुसंख्य महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.