पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा अकोला जिल्हा दौरा
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी विविध विषयांच्या आढावा बैठका
अकोला, दि. 13 : राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दि. 15 व 16 ऑक्टोबर रोजी अकोला येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत अतिवृष्टी नुकसान, ई पीक- पाहणी, पीकविमा, गौण खनिज, रस्ते, विविध प्रकल्पांचे कामकाज आदी विषयांवरील आढावा बैठक सोमवारी (16 ऑक्टोबर) होणार आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दि. 15 ऑक्टोबर रोजी दु. 4.30 वा. शिवणी विमानतळ, अकोला येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, अकोल्याकडे प्रयाण, दु. 4.45 वा. शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन व राखीव, सायं. 5 वा. मोटारीने शेगावकडे प्रयाण. 5.45 वा. शासकीय विश्रामगृह, शेगाव येथे आगमन व राखीव, सायं. 6 वा. मोटारीने श्री. गजानन महाराज मंदिर, शेगावकडे प्रयाण, 6.15 वा. श्री गजानन महाराज मंदिर येथे आगमन व श्रींचे दर्शन. सोयीनुसार मोटारीने अकोल्याकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन, राखीव व मुक्काम.
दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, अकोल्याकडे प्रयाण. सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व नियोजनभवनात जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 12 वा. नविन शासकीय रूग्णालयाचे सादरीकरण व आढावा बैठक, तसेच इतर केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांचे सादरीकरण व आढावा बैठक, दु. 1 ते 1.45 शासकीय विश्रामगृह येथे राखीव, दु. 2 वा. महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या आढावा व समन्वय बैठकीस उपस्थिती, दु. 4 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, अकोल्याकडे प्रयाण व विश्रामगृह येथे राखीव. दु. 4.30 वा. मोटारीने शिवणी विमानतळ, अकोल्याकडे प्रयाण, दु. 4.45 वा. शिवणी विमानतळ येथे आगमन. सायं.5.15 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.