बुलढाणा अर्बनचा गरबा यावर्षी केवळ दोन दिवसांचा!
प्रशासकीय परवानगी मिळायला उशीर झाल्याने, बुलढाणा अर्बन बीसीसीएन गरबा समितीचा निर्णय.
बुलढाणा : नवरात्री उत्सवात दरवर्षी बुलढाणा अर्बन बिसीसीएन गरबा समिती कडून गरब्याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये शहरातील मुली व महिलावर्ग उस्फूर्तीने सहभाग नोंदवितात. परंतु यावर्षी पोलीस प्रशासनाच्या परवानगीसाठी विलंब झाल्या कारणाने दोन दिवसाच्या गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ मुली व महिलांकरिता आयोजित करण्यात आलेला गरबा सहकार विद्या मंदिरच्या सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी ७ ते ९ यावेळेत पार पडणार असून सदर गरब्या सोहळ्यासाठी बुलढाण्यातील मुली व महिला वर्ग यांना बुलढाणा अर्बन बीसीसी गरबा समितीच्या वतीने निमंत्रित केल्या गेले आहे. प्रशासकीय परवानगी लवकर मिळाली नसल्याकारणाने गर्भ उत्सव स्थगित करण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला होता परंतु गरबा परंपरेला खंड पडू नये अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केल्यानंतर या इच्छेचा सन्मान करीत कोमलताई झंवर आणि समितीने दोन दिवसीय गरबा महोत्सव आयोजित करण्याचे ठरवले आहे.